कोल्हापूरमध्ये ४० वर्षानंतर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक अमितकुमार यांचा गाण्याचा कार्यक्रम २६ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी सोशल मिडिया पार्टनर आणि ई-तिकिटींग पार्टनर म्हणून मिडियाटेकने काम पाहीले. कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने तुडुंब भरलेल्या सभागृहातील प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आणि अमित कुमार यांच्या एनर्जेटिक बहारदार सादरीकरणाने पार पडला.
दिनेश माळी फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित "Amit Kishore Kumar – Live in Concert" हा भव्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात उत्साहात पार पडला. आपल्या हृदयस्पर्शी आवाजाने आणि सुरेल सादरीकरणाने अमित कुमार यांनी कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. "बडे अच्छे लगते हैं", "रोज रोज आंखों तले", "याद आ रही है", "ये जमीं गा रही है", "कह दो कि तुम", "क्या हुआ इक बात पर", "दिल में बजी गिटार", "ना बोले तुम ना बोले मैं", "दीवाना दिल दीवाना" या त्यांच्या लोकप्रिय गीतांसह त्यांनी अनेक किस्से सांगत वातावरण रंगवले. या कार्यक्रमात त्यांना साथ दिली इंडियन आयडॉल फेम आहाना चॅटर्जी आणि कन्या मुक्तिका अमितकुमार यांनी त्यांच्या मधुर आणि ऊर्जावान गायनानेही कार्यक्रमात रंगत आणली. कोल्हापूरचे दिनेश माळी, प्रशांत साळवी, मकरंद पाटणकर यांनीदेखील आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमात विशेष रंग भरला. त्यांनी अमितकुमार यांच्यासोबत स्टेज शेअर करत एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी सादर केली.
संगीत आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम गेल्या १२ वर्षांपासून दिनेश माळी फौंडेशन कोल्हापुरात सामाजिक जाणीव असलेले दर्जेदार संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहे. संगीत साधना आणि करमणूक जबाबदारीने हा संस्थेचा मूलमंत्र आहे. आतापर्यंत भारतातील अनेक प्रसिद्ध गायक व कलाकारांच्या सुरेल मैफली कोल्हापूरमध्ये आयोजित करून दिनेश माळी फौंडेशनने सांस्कृतिक स्तर उंचावला आहे.
EVENT HIGHLIGHTS
MAKING OF THE SHOW
CAMPAING OPNER (TEASER)
FACEBOOK ADS (TICKET SALE CAMPAIGN)
PROMOTIONAL REELS
CAMPAIGN FEED & STATS
CAMPAIGN FEED
EVENT DAY
POST EVENT